Buying Property On Moon | चंद्रावर जमीन विकत घेणे – मोठी फसवणूक

चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यापासून जगभरात भारताचे कौतुक केले जात आहे. तेव्हापासून Buying Property On Moon अर्थात चंद्रावर जमिन विकत घेणे, यावर जास्तच प्रकाशझोत पडत आहे. देशभरात चांद्रयान मोहिमेच्या चर्चा या राजकीय चर्चांइतक्याच उत्सुकतेने केल्या जात आहेत. मात्र आता या सगळ्याने जरा वेगळेच वळण घेतल्याचे  दिसून येत आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता चंद्रावर अजून निरनिराळे शोध लागत आहेत. इकडे जीव सृष्टी तग धरू शकते किंवा मनुष्य वस्ती होऊ शकते का, हे देखील पाहिले जात आहे. अश्या बातम्या पुढे येत आहेत. त्यामुळे एका प्रतिष्ठित आणि मोठ्या उद्योगपतीने किंवा मग एखादया मोठ्या फिल्मस्टारने चंद्रावर स्वतः च्या मालकीची करोडो रुपयांनी जागा घेतली, अश्या न्यूज, रिल्स आणि व्हिडीओज सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. माणूस आणि तंत्रज्ञान इतके प्रगत झालेत की ते आता चंद्रावर जमीन खरेदी करून राहू लागलेत. आता तुम्ही ही चंद्रावर अगदी सहज जमीन घेऊ शकता अश्या प्रकारचा मेसेज जर तुम्हालाही आला असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत नक्की वाचा.

Buying Property On Moon

नेमका मुद्दा काय आहे?

जग जसं डिजिटल प्रगती करत आहे त्याचप्रमाणे, डिजिटल चोरी आणि फसवणूक होण्याचं प्रमाणही तितकंच वाढत जात आहे. ऑनलाइन स्कॅम (Online Scam) आणि मनी स्कॅम (Money Scam ) हे आणि असे बऱ्याच प्रकारचे स्कॅम आपल्याला या डिजिटल युगात परिचयाचे झाले आहेत. यातच आता नव्याने भर पडली आहे ते म्हणजे मून स्कॅमची (Moon Scam). चंद्रावर आता तुम्ही सुद्धा सोप्या पद्धतीने एका वेबसाईटच्या मदतीने जमीन खरेदी करू शकता, अश्या प्रकारच्या व्हायरल होणाऱ्या मेसेजने अनेकांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. हा मुन स्कॅम (Moon Scam )  होतो तरी कसा?  नक्की आहे तरी काय हा मुन स्कॅम ? चला तर मग जाणून घेऊया…

इतिहास काय आहे?

अगदी सुरुवातीपासून सांगायचे झालेच तर 1960 मध्ये रशिया आणि यूएसएमध्ये शक्तिप्रदर्शन होत होते. अंतराळ मोहीमेवरून या दोन्ही देशात शीतस्पर्धा सुरू झाली. अप्रत्यक्षरीत्या ताकदवान कोण हे दाखवण्यासाठी चंद्रावर वाऱ्या व्हायला लागल्या. पृथ्वी व्यतिरिक्त मनुष्य वस्ती कुठे राहू शकेल तर तो एकमेव ग्रह म्हणजे चंद्र हे जगभरातील देशांना वाटू लागले, त्यामुळे पुढे जाऊन कोणताही देश एका विशिष्ट ग्रहावर आपली मालकी हक्क सांगू नये किंवा कोणत्याही प्रकारचे यावरून जगात महायुद्ध होऊ नये, याकरिता करार करण्यात आला. या करारामध्ये संयुक्त राष्ट्रांचा ही सहभाग होता.या करारावर भारताने स्वाक्षरी केली होती. 1967 मध्ये आऊटर स्पेस ट्रीटी (outer space treaty) या झालेल्या करारानुसार भविष्यात कोणत्याही देशाने कोणत्याही ग्रहावर यशस्वी मोहीम केली तरी, त्या ग्रहावर संबंधित देशाचा मालकी हक्क असणार नाही.

चंद्रावर जमिन कोण विकतंय? Who Sells Property On the Moon?

अलीकडच्या काळात अंतराळ क्षेत्रात होणाऱ्या यशस्वी मोहिमेनंतर संयुक्त राष्ट्राला एक निनावी पत्र आले. त्या पत्रातील मजकूर असा होता की, चंद्रावर माझा हक्क आहे. जर तुमची काही हरकत असेल तर तुम्ही या पत्राला उत्तर द्याल. या मजकुरात कोणत्याही देशाचा उल्लेख नव्हता. संयुक्त राष्ट्राने या पत्राला फार गंभीरपणे घेतले नाही, व त्या पत्राला प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे त्यानंतर या अज्ञात व्यक्तीने lunar embassy या  नावाने फेक कंपनी सुरू करत, एक वेबसाईट तयार केली. या वेबसाईटच्या माध्यमातून ही व्यक्ती लोकांना चंद्रावर एक एकर, दोन एकर अशी जमीन विकत देऊ लागली. यानंतर अश्या असंख्य फेक वेबसाईट सुरू झाल्या ज्या चंद्रावर आणि मंगळावर तुम्ही अगदी सहजपणे जमीन खरेदी करू शकता असे सांगून लोकांची दिशाभूल करू लागल्या. या अश्या फेक वेबसाईटने अनेकांना करोडो रुपयांना गंडा घातला. या वेबसाईट करतात काय तर तुम्हाला चंद्रावर, मंगळावर अगदी सहजपणे हवी तशी जमीन विकत घेता येते, अगदी सोप्या पद्धतीने. अश्या प्रकारचे आमिष दाखवून तुम्ही पैसे भरल्यावर तुम्हाला एक फेक सर्टिफिकेट देण्यात येते. ज्यातून तुम्हाला असे सांगितले जाते की तुम्ही विशिष्ट ग्रहावर स्वतःच्या मालकीची जमीन खरेदी केली आहे.

खरंच चंद्रावर जमिन घेता येते का? Buying Property On Moon

वास्तविक पाहता या सर्टिफिकेटला काहीच तथ्य नसते. कारण कोणत्याही ग्रहावरील जागेवर कोणीही हक्क दाखवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला देण्यात आलेल्या कागदी सर्टिफिकेटला कोणतेही महत्व राहत नाही. चंद्रावर जमीन विकत मिळण्याचे खोटे आमिष दाखवून लोकांकडून 100 डॉलर्स, हजार डॉलर्स अशी वाटेल ती किंमत घेऊन या फ्रॉड वेबसाईट्स फेक सर्टिफिकेट देत आहेत. जगभरात मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहेत. त्यामुळे अश्या भूलथापांना बळी न पडता आपण कोणत्याही वेबसाईटवर पैसे देताना खबरदारी घेण्यात यावी असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते. या जागतिक पातळीवर झालेल्या स्कॅम (scam) नंतर आता सायबर क्राईम ब्रांच अलर्ट झाली असून सतत स्वतःच्या आर्थिक गुंतवणूकीची योग्य चौकशी करण्यात यावी असे आवाहन केले जात आहे.

फसवणूक झाली असेल तर किंवा होऊ नये म्हणून काय करावे?

जर तुमच्याही बाबतीत असा किंवा अश्याप्रकारचा स्कॅम झाला असेल, किंवा तुमच्या माहितीत असा कोणताही  स्कॅम घडला असेल तर, तुम्ही 1930 या टोल फ्री नंबर वर संपर्क करू शकता, किंवा शासनाच्या www.sybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. शक्य तितके आणि शक्य तेवढे आपली सायबर सिक्युरिटी सेफ ठेवणे हे आपल्या हिताचे असते. त्यामुळे कोणत्याही लिंक्स, कोणतीही वेबसाईट हाताळताना आपली सायबर सिक्युरिटी (Cyber Security ) चेक करण्याचा अधिकार समोरील वेबसाईट Admin ला देऊ नये. कोणतीही वेबसाईट ओपन करण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्यावी आणि मगच ती हाताळावी. याबाबत सायबर क्राईम ब्रांच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात कायम तत्पर असते.

कोणत्याही भूलथापांना बळी पडण्याआधी त्या त्या ऑनलाइन वेबसाईटची पूर्णतः चौकशी करूनच पैसे गुंतविणे फायद्याचे ठरते. कितीही श्रीमंत व्यक्ती असली तरी कोणताही देश कुठल्याही ग्रहावर मालकी हक्क दाखवू शकत नाही. त्यामुळे कितीही बातम्या आल्या रिल्स किंवा मेसेज आले की, मोठ्या सेलिब्रिटींनी किंवा उद्योगपतीने कुठल्याही ग्रहावर जमीन घेतली, या आणि अश्या खोट्या बातम्यांना या माहितीमुळे पूर्णविराम मिळतो.

इस्रोबद्दल थोडेसे (About ISRO)

चांद्रयान-3 चे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले असले तरी जीवसृष्टी राहू शकेल किंवा नाही याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. इस्रोच्या या दमदार कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत असले तरी इस्रोचा इतिहास तुम्हाला माहितेय का? 1962 मध्ये भारताने अंतराळ संशोधन समिती स्थापन केली. त्यावेळी या समितीचे अध्यक्ष डॉ. विक्रम साराभाई होते. तेव्हा भारताच्या अंतराळ समितीचे नाव Indian National Committee for Space Research म्हणजेच INCOSPR असे होते. त्यानंतर डॉ.साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली काही वर्षांने INCOSPR चे ISRO म्हणजेच Indian Space Research Organization असे नामांतर करण्यात आले. ते आजतागायत ISRO याच नावाने ओळखले जाते.चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमे नंतर इस्रोचे जगभरात कौतुक होत असून, चांद्रयन मोहिमेच्या आधी इस्रोने 2013 आणि 14 दरम्यान मिशन मंगळ हाती घेतले होते.

इस्रोची मंगळयान मोहीम

मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश करणारा भारत हा आशियाई देशातील पहिला देश आहे. सलग आठ वर्षे मंगळाचा  इस्रोकडून अभ्यास सुरू होता, मात्र 2022 मध्ये मंगळयानाचा इस्रोशी संपर्क तुटला. याच कारणास्तव आता इस्रोने पुन्हा नव्याने मिशन मंगळ हाती घेण्याचे ठरविले आहे. असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. मात्र या मंगळ मोहीमेचे स्वरूप कसे असेल याबद्दलची अधिकृत माहिती इस्रोकडून अजून तरी अस्पष्ट आहे. आदित्य एल 1 चा सातत्याने इस्रोकडून पाठपुरावा करण्यात येत असून काही दिवसांपूर्वीच आदित्य एल-1 (Aditya L -1) द्वारे पृथ्वी आणि चंद्राचा टिपलेला फोटो इस्रोने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून शेयर केला. इस्रोने शेयर केलेल्या या फोटोंनी अवघ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले.

इस्रोची नवे मिशन आदित्य एल 1 (Aditya L1 )

इस्रोची नवे मिशन आदित्य एल 1 (Aditya L1 ) या सौर मोहीमेवर आता जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले आहे. चांद्रयान (Chandrayan), मंगळ मोहीम (Mission Mangal) , आदित्य एल -1 ( Aditya L-1) आणि येत्या काही वर्षात येणाऱ्या मिशनपैकी एक, मिशन शुक्रयान (Mission Shukrayan) जे शुक्र ग्रहावरील जागेवरचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर संशोधन करण्या करिता केले जाणार आहे. त्याच प्रमाणे  गगनयान आणि निसार या इस्रोच्या महत्वपूर्ण मोहीम असून येणाऱ्या वर्षात इस्रोकडून त्याची अधिकृत माहिती शेयर केली जाईल. इस्रोच्या या आगामी मोहीमचे येत्या काही वर्षांत योग्य रित्या अंमल बजावणी करण्यात आली आणि सगळ्या मोहीम यशस्वीपणे पार पडल्या तर, अंतराळात क्षेत्रातील भारताची ही उल्लेखनीय कामगिरी ठरणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका ही  महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a comment