भारतीय जनता पार्टी पन्हाळा मंडलच्या उपाध्यक्ष पदी बबन चौगले यांची निवड

भारतीय जनता पार्टी पन्हाळा तालुका नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. मा.आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडीची पत्रे देण्यात आली. पक्षाशी एकनिष्ठा, प्रामाणिक काम, पक्षवाढीसाठी पन्हाळा तालुका परिसरातील काम याची दखल घेऊन, बबन चौगले यांच्याकडे पन्हाळा मंडल उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पक्षाने दिलेली जबाबदारी हा मी माझा सन्मान समजतो व ही जबाबदारी स्वीकारून अजून जोमाने पक्षाच्या कार्याला लागू असे बबन चौगले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

bjp panhala baban chougale
भारतीय जनता पार्टी पन्हाळा मंडलच्या उपाध्यक्ष पदी निवडीबद्दल पत्र स्वीकारताना

 

सदर कार्यक्रमाला अमल महाडिक यांच्या सोबत, राजवर्धन निंबाळकर, राजाराम शीपुगडे, प्रवीण प्रभावळकर, डॉ. अजय चौगुले, शिवाजी पाटील (मामा), अमर भोसले, सुरेश बेनाडे, अमरसिंह काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.

Leave a comment