गौतमी पाटीलचा थक्क करणारा जीवनप्रवास अर्थात Gautami Patil Biography, सदरच्या लेखात आपण पाहणार आहोत. आपल्या मोहक अदा आणि नृत्याने प्रेक्षक वर्गाला फॅन करून टाकलेल्या तसेच अगदी कमी वयात अमाफ प्रसिद्धी मिळवलेलं नाव सर्वानाच परिचित आहे ते म्हणजे गौतमी पाटील. गौतमीचे दिसणे, हसणे, डान्स, अदा या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. अनेक टीका झाल्या, नेटकऱ्यांनी ट्रोल केले पण, त्या मागचे कष्ट, तिच्या वेदना, तिचा भूतकाळ, तिच्या डोळ्यातले अश्रू हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तिच्या अनेक मुलाखती झाल्या आहेत, अनेक न्यूज चॅनलनी आपल्या स्टुडिओमध्ये बोलावलं, नुकतेच तिला माझा कट्टावर बोलवण्यात आले या सर्वांतून गौतमीचा प्रवास, कारकीर्द, करियर, कुटुंब या सर्वांचा खुलासा होतो. जाणून घेऊया गौतमी पाटीलचा जीवनप्रवास…
गौतमी पाटीलचे बालपण
धुळ्यामधील शिंदखेडा हे गौतमीच्या आईचे माहरचे गाव असून ती याच गावात जन्मली, शिकली, मोठी झाली. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे, म्हणजेच चोपडा हे तिचे मूळ गाव, मात्र गौतमी व तिची आई पहिल्यापासून शिंदखेड इथेच राहत असल्याने तिचा चोपडा या मूळच्या गावी फारसा काही संबंध आला नाही. तिचे सर्व बालपण, आठवी पर्यंतचे सर्व शिक्षण तिने शिंदखेड इथूनच पूर्ण केले. यामुळेच तिचा वडिलांच्या इकडे काही संबंध आलाच नाही. तिच्या आजोळी तिला दोन मामा त्यांची मुले, यानंतर मावशी त्यांची मुले आणि आजोबा अशी तिची फॅमिली. दोन्ही मामा पुण्यात असल्याने आजोबांनी तिचा लहानपणापासून सांभाळ केला. शिंदखेडा इथेच गर्ल्स हायस्कूलमध्ये तिने आठवी पर्यंत शिक्षण घेतले. नंतर ती तिच्या आईसोबत पुण्यात आली. लहानपापासूनच गावात रुळलेल्या गौतमला पुणे पटकन मानवल नाही.
गौतमी पाटीलचे वडील
अचानक पुण्यात येण्याचा निर्णय तिच्या स्वतःचा किंवा वैयक्तिक तिच्या आईचा नव्हता. तीच्या पुढच्या भविष्यासाठीच्या दृष्टीने हा निर्णय तीच्या आजोळच्या फॅमिलीने घेतला होता. कारण ती आता लहान राहिली न्हवती तिला पुढे स्वतःचे भविष्य होते शिवाय आजोबासुद्धा किती दिवस सांभाळत राहणार होते? तीचे करिअर आणि या दोघींनाही एक आधार हवा होताच या सर्वाचा विचार करून तिच्या मामांनी तिला व तिच्या आईला पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला होता. सर्वकाही सुरळीत होऊ शकते, पुन्हा एकदा या दृष्टीने विचार करून तिचे मामा तिच्या वडिलांकडे गेले व त्यांना समजावून सांगत त्यांना या दोघींकडे पुण्यात घेऊन आले. तेव्हा गौतमीने पहिल्यांदा तिच्या वडिलांना पाहिले. तसे लहानपापासूनच तिला माहित होते की तिचे वडील हयात आहेत फक्त आई आणि ते एकत्र का राहत नाहीत याचे कारण तिला अद्याप आठवीपर्यंत माहिती न्हवत. तिलाही वाटायचं आपले वडील आपल्यासोबत असावेत, काही वेळेस तिने आईला याबाबतीत विचारूनही पाहिले पण तेव्हा तिचे लहान वय लक्षात घेऊन तिच्या आईने याची उत्तर देण्याचं टाळले होते. अखेर आठवीत असताना प्रत्यक्ष समोरासमोर वडिलांना पाहून त्यांनतर तिला या प्रश्नाचं उत्तर मिळाले. गौतमीच्या वडिलांना मद्यपानाचे व्यसन होते, यामध्येच भांडण, मारहाण यामुळे गौतमीची आई तिला घेऊन इथेच तिच्या माहेरी राहिली होती. झालं गेलं विसरून जाऊन मामांनी तिच्या वडिलांना समजावून सांगत त्यांना पुण्याला आणले, त्यांना जॉबही लावून दिला, भारती विद्यापीठला रुमही घेऊन दिली. आता सर्वकाही सुरळीत होईल अशी सर्वांनाच खात्री होती. मात्र तिचे वडील फार काळ तिथे राहू शकले नाहीत, त्यांचे ड्रिंक करणे सुरूच होते त्यात कामावर नीट राहने देखील त्यांना जमले नाही. पुन्हा घरी वाद होऊ लागले. त्यांना पुण्यात यांच्यासोबत राहायचं न्हवतच त्यामुळे ते गावी निघून गेले.
गौतमी पाटील पुण्यात आल्यानंतर…
या सर्वामध्ये गौतमीची आई छोटी मोठी कामे करून घर चालवू लागली. आठवी नंतरचे शिक्षण गौतमी पुण्यात धायरी येथे बंडोजी खंडोजी या शाळेत घेऊ लागली. सुरुवातीपासून डान्स चे वेड असणाऱ्या गौतमीला त्यामानाने अभ्यासात फारसा रस न्हवता. त्यामध्ये गावाकडील शिक्षण आणि पुण्यातील शिक्षण यामध्ये खूपच फरक होता. शिवाय जुन्या सर्व मैत्रिणीसुद्धा गावाकडे राहिल्या होत्या. इथे पुण्यात तिची एकच मैत्रीण होती जीच्यासोबत ती राहिली, बाकी इतर कोणीच तिच्याशी फारसे बोलत नव्हते पण तिनेही फारसे याकडे लक्ष न देता जेवढं आहे तेवढं स्वीकारत ती पुढे वाटचाल करत राहिली. मात्र पुण्यात आल्यानंतर गावाकडचे दिवसांची तिला आठवण यायची.तिचे ते बालपणीचे दिवसच खूप वेगळे होते, खूप साऱ्या मैत्रिणी, त्यांच्यासोबत एकत्र बागडण, राहणं, धमाल करण, पावसात भिजणं सर्व काही खूप छान होत. गावाकडे असताना मैत्रिणीसोबत सर्व सनसुद्धा तिने खूप आनंदाने साजरे केले होते. पुण्यात मात्र तिच्यासोबत या सर्व आठवणीच शिल्लक राहिल्या होत्या.
गौतमीच्या आईचा संघर्ष
आठवी ते दहावी पर्यंत तिने पुण्यात शिक्षण घेतले. याच दरम्यान तिच्या आईचा पीएमटीचा धक्का लागून अपघात झाला. यामध्ये तिच्या डोक्याला पाठीमागे दुखापत झाली,टाके पडले. आणि यानंतर तिला सतत चक्कर येऊ लागली व तणावामुळे काम करणं जमेना. घरी तर कमावणारी आईचं होती. तिच्याच जीवावर घर चालले होते. आईचाच अपघात झाल्याने घरात आर्थिक चणचण भासू लागली. अखेर तिच्या आईने स्वतःचे मंगळसूत्र विकले आणि त्या आलेल्या पैश्यात या दोघींचा उदरनिर्वाह चालू लागला. असेच दिवस जात होते, मध्यंतरी तिच्या आईच्या मैत्रिणीला तिची आई बोलली की, माझ्या मुलीला डान्सचे खूप आणि इथूनच गौतमीच्या डान्समधील करिअरची सुरुवात झाली.
गौतमी पाटीलचा पहिला डान्स
आईच्या मैत्रिणीच्या ओळखीवरती गौतमी लावणी कलाकार व शिक्षक महेंद्र बंसुळे यांना भेटली. मात्र अद्याप इथपर्यंत येईपर्यंत लावणी हा विषय होता हे तिला माहीत नव्हते, फक्त डान्स करायचा आहे असेच तेव्हा तिला सांगण्यात आले होते. यानंतर दोन दिवस बिट्स वरती गेल्यानंतर सरांनी घुंगरू आणावे लागतील आणि यासाठी पाचशे रुपये लागतील असे सर्वांना सांगितले. त्यावेळी पाचशे रुपये देणे गौतमीसाठी खूपच कठीण आणि मोठी रक्कम होती. पण तिने ठरवलं होतं की आता मागे फिरायचे नाही. तिने आईला सांगितले घुंगरूसाठी पाचशे रुपये हवे आहेत, तेव्हा आईने इकडचे तिकडचे पैसे जमा करून तिला घुंगरू घेतले आणि अकलूज लावणी महोत्सव इथे गौतमीने बॅक डान्सर म्हणून पहिला डान्स केला, यानंतर इथूनच तिची या क्षेत्रात लिंक लागली गेली. यानंतर तिने अनेक कार्यक्रम करत, कार्यक्रम घेत स्वतःच्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकवर्ग, आयोजक वर्ग यांची मने जिंकत स्वतःचा पहिलावाहिला कार्यक्रम वाघोली येथे केला. इथूनपुढे तिला तिचे वैयक्तिक कार्यक्रम मिळू लागले. तिच्या खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात झाली, आणि गौतमी नावाची नृत्यांगना आज प्रसिद्धीस आली. गौतमीचे वेड असणारा डान्स हेच तिच्या उदरनिर्वाहाचे साधन तसेच तिच्या प्रसिद्धीचे कारण बनेल याबाबत तेव्हा तिला जराही अंदाज नव्हता.
गौतमीचा विरोध आणि ट्रोलिंग
आज अनेकदा गौतमीला तिच्या डान्स प्रकारावरून ट्रोल केले जाते. ती पारंपरिक पद्धतीने लावणी न करता वेगळ्या प्रकारे करून पारंपरिक पद्धतीच्या लावणीचा अपमान करते, यामुळे हीच पद्धत सुरू राहून पारंपरिक लावणी संपुष्टात येईल, असे अनेक आरोप मध्यंतरी तिच्यावर केले गेले तसेच अजूनही केले जातात. मात्र आपण तिचे सुरुवातीपासूनचे डान्स पाहिले तर आपल्याला कळून जाईल की ती सुरुवातीपासूनच वेस्टर्न डान्सर आहे. अगदी सुरुवातीपासूनच तिला डान्सची आवड होती. ज्यावेळेस तिने घुंगरू घेतले होते तेव्हाही तिला अंदाज न्हवता की तेव्हा तिला लावणी सादर करायची होती. पण यानंतर पुन्हा ती डान्स कडे वळली. लावणीसाठी तिच्या आईचा तेव्हाही विरोध होता.
मध्यंतरी काही लोकगीतांसाठी तिने पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली होती मात्र डान्स पूर्णतः लावणीच्या विरुद्ध असल्याने लावणी कलाकार तसेच इतर सर्व लावणी चाहते वर्ग, आयोजक हे तिच्यावर नाराज झाले होते. तेव्हा गौतमीने मी एक वेस्टर्न डान्सर आहे , वेशभूषेमुळे तुमचा गैरसमज झाला आहे किंवा स्टेजवरती मी लावणी करत न्हवते, इत्यादी स्वतःची स्पष्टीकरणे देत न बसता अतिशय नम्रपणे स्वतःच्या चुका स्वीकारत सर्वांची माफी मागितली.
इतर कलाकारांच्या पोटावर पाय?
आज तिच्या होणाऱ्या प्रसिद्धीमुळे इतर कलाकारांचे म्हणणे असते की, त्यांना कार्यक्रम मिळणे बंद झाले आहेत. यावरही अतिशय विनम्रपणे गौतमी म्हणते की, मला आलेले कार्यक्रम मी घेते, पण म्हणून मी कोणाच्याही पोटावर पाय नाही आणत. कारण जशी मी एक कलाकार आहे तसेच तेदेखील आहेत. कलाकार म्हणून कला सादर करणं माझं काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करते आणि नेहमी करत राहीन.
गौतमीसाठी स्टेज हेच तीच सर्व काही आहे, इथे आली की ती सर्व विसरून जाते. याचबरोबर तिच्या नृत्याला मिळणारा प्रेक्षकवर्ग, त्यांचा मिळणारा प्रतिसाद यापेक्षा अधिक सुंदर गोष्ट कोणत्याही कलाकारासाठी नसते. आणि हे सर्व तिने स्वतःच्या नृत्याने कमावले आहे. मध्यंतरी तिच्याकडून नकळत घडलेल्या चुकांमुळे मनात एक भीती होती की, प्रेक्षकवर्ग तिला कसा प्रतिसाद देईल, मात्र तिच्या नृत्यावर खुश होत प्रेक्षक वर्गानेही तिला सांभाळून घेतले, त्यांचा हाच प्रतिसाद तिच्या प्रसिद्धीसाठी मोलाचा ठरला. या सर्वात टीका करणाऱ्या बरोबरच तिला सांभाळून घेणारेही तितकेच होते. या सर्वांची ती नेहमीचं ऋणी आहे. आज आपण पाहतो की, तिच्या प्रेक्षकवर्गामध्ये महिलाही मोठ्या संख्येने येऊ लागल्या आहेत.
गौतमी पाटीलचे मानधन (Gautami Patil Fees)
एखाद्या कलाकाराला आणखी काय हवं असतं. त्याच्या कलेला मिळणारी दाद बस यातच त्याच समाधान असत बाकी लाखोंची मानधने तर ही निव्वळ अफवा आहेत. तिचे मानधन यापेक्षा कमी आहे. आणि या सर्वांचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ती ते तिच्या माझ्या आईला आणि वडिलांना दोघानाही देते. इथेही तिच्या नम्र वृत्तीची पावती मिळून जाते. वडीलांच्या चुका मनात ठेवून त्यावर बोलत न बसता त्यांचं वागणं सकारात्मक घेत ती त्यांचं वागणं आपल्या करिअरसाठी चांगल ठरल असेच म्हणते. ते जर तसे वागले नसते तर आज मी सर्वसामान्य जीवन जगत असते, तशी आताही मी सर्वसामान्यंचं आहे मात्र इथपर्यंतचा पल्ला गाठू शकले नसते. की करियर म्हणून मी डान्स क्षेत्र निवडले नसते असे ती म्हणते.
एक कलाकार होन इतकं सोप नसत.कोणी आवडीने क्षेत्र निवडत तर कोणी गरजेने, प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. कोणी काहीही म्हणो आपण आपल काम प्रामाणिकपणे करत राहायचं हा धडा नक्कीच आपल्याला गौतमीच्या जीवनप्रवासातून मिळून जातो.