भारताच्या समुद्रयान – मत्स्य 6000 या मोहिमेबद्दल आपण इकडे सविस्तर जाणून घेऊयात. Samudrayaan Matsya – 6000 Information in Marathi ज्याचे आरमार त्याचा समुद्र. ज्याची समुद्रावर सत्ता त्याचे राज्य मजबूत. The Father Of Indian Navy म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाक्यं, आजच्या काळातही अगदी तंतोतंत लागू पडतात. हे सांगण्याचे कारण म्हणजे भारताचे नवे मिशन समुद्रयान. चांद्रयान (Chandrayaan), आदित्य एल-1 (Aditya L-1), यांनी अवकाशातील उल्लेखनीय कामगिरी बजावली. काही दिवसांपूर्वीच आदित्य एल- 1 (Aditya L -1) द्वारे पृथ्वी आणि चंद्राचा टिपलेला फोटो इस्रोने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून शेयर केला. इस्रोने शेयर केलेल्या या फोटोंनी अवघ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले. इस्रोचे नवे मिशन आदित्य एल 1 (Aaditya L1 ) या सौर मोहीमेवर आता जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले आहे. चांद्रयान (Chamdrayaan), मंगळ मोहीम (Mission Mangal) , आदित्य एल -1 ( Aditya L-1) आणि येत्या काही वर्षात येणाऱ्या मिशनपैकी एक, मिशन शुक्रयान (Mission Shukrayaan), जे शुक्र ग्रहावरील जागेवरचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर संशोधन करण्याकरिता केले जाणार आहे. चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमे नंतर इस्रोचे जगभरात अजून कौतुक होत आहे तोच, आता भारत समुद्राच्या तळाला जाऊन सखोल संशोधन करण्यास तयार झाला आहे. या मानवयुक्त यानाला समुद्रयान – मत्स्य 6000 (Samudrayaan Mastya – 6000) असे नाव देण्यात आले आहे. मंत्री किरेन रिजिजू यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर करत माहिती दिली.

समुद्रयान – मत्स्य 6000 नेमकं काय आहे?
असे म्हणतात की, निसर्गाच्यापुढे माणूस कधीच जाऊ शकत नाही. खोल समुद्रात जाऊन त्याची माहिती घेणे हे अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीची जबाबदारी आहे. मात्र ही जोखीम घेण्यास भारत सज्ज होत आहे. हे समुद्रयान समुद्राच्या 6000 फूट खोल खाली जाऊन समुद्रातील जैवविविधता, खनिजे, धातू यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय समुद्राच्या आतील नैसर्गिक सौंदर्याची पर्यटनासाठी होणारी मदत, याकरिता हे मिशन असणार आहे. कॅमेरे, सेन्सर आणि मॅनिपुलेटरसह विविध वैज्ञानिक उपकरणांचा या यानामध्ये समावेश करण्यात आला आहे. मिशन समुद्रयान (Mission Samudrayaan) हे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे मिशन ठरणार आहे. समुद्रयान मत्स्या-6000 (Samudrayaan Matsya-6000) या भारतीय बनावटीच्या पाणबुड्यामार्फत तीन जणांना सुमद्राच्या आत नेलं जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असल्यामुळे समुद्रातील अनेक रहस्यमय गोष्टींचा अभ्यास करणे सुलभ होईल, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. हे मिशन 2026 मध्ये होणार असून चेन्नईमधून त्याचे प्रक्षेपण करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र असे असले तरी ही अजून भारतातला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या समुद्रयान मिशनकरिता पाठवण्यात येणाऱ्या संशोधकांची निवड आणि इतर सर्व बाबींचा विचार करून हे मिशन पार पाडण्यात येईल.
Next is “Samudrayaan”
This is ‘MATSYA 6000’ submersible under construction at National Institute of Ocean Technology at Chennai. India’s first manned Deep Ocean Mission ‘Samudrayaan’ plans to send 3 humans in 6-km ocean depth in a submersible, to study the deep sea resources and… pic.twitter.com/aHuR56esi7— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 11, 2023
500 मिटर खोल जाऊन चाचणी
2021 मध्ये बंगालच्या उपसागरात याआधी 500 मीटर आत जाऊन समुद्राचा अभ्यास करू शकेल, अशी पाणबुडी निर्माण करण्यात आली. या पाणबुडीमध्ये एक व्यक्ती राहू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. या पाणबुडीच्या यशस्वी चाचणीनंतर भारताने समुद्रयानाचे मिशन हाती घेतले. समुद्रयान मत्स्य 6000 (Samudrayaan Matsya 6000) मध्ये तीन संशोधकांना पाठवले जाणार आहे. ही पाणबुडी 12 तासात 6000 किलोमीटर अंतर पार करून खोल समुद्रात जाणार आहे. या पाणबुडीमध्ये अचानक काही समस्या निर्माण झालीच तर 96 तास ऑक्सिजन सहजरित्या मिळू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे यान सध्या चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी National Institute Of Ocean Technology (NIOT) यांच्या देखरेखीखाली असून या समुद्रयानाची चाचपणी सुरू आहे.
समुद्रयान – मत्स्य 6000 चा उद्देश
पृथ्वीच्या पोटात जाऊन सागरतळाची रचना आणि त्यातून विकसित होत जाणारे संशोधन हा भारतीय मिशन समुद्रयानाचा महत्वाचा उद्देश आहे. कोबाल्ट (cobalt), सल्फाईड ( sulfide) ,गॅस हायड्रो थर्मल (Gas Hydro Thermal) या विविध धातूंच्या अभ्यासासाठी हे मिशन महत्वपूर्ण मानले जाते. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज आणि विविध वनौषधी शोध या सागरी मोहिमेत घेण्याचा प्रयत्न असणार आहे. मिशन समुद्रयानासाठी गेले पाच वर्षे भारताकडून सतत पाठपुरावा करण्यात येत होता. सध्या या पाणबुडीच्या बांधकामचे अद्याप पूर्ण झाले नसले, तरी 2026 मध्ये समुद्रयान मत्स्य- 6000 याची अंमल बजावणी करण्यात येणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे. भारताच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या नेतृत्वाखाली समुद्रयानाचे डिझाइन, चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आयआयटी (IIT) आणि इस्रो (ISRO ) यांचाही समावेश करून घेण्यात आला आहे.समुद्रयान मत्स्य 6000 (Samudrayan Matsya 6000) हे मिशन खोल समुद्रात संशोधन करणारे भारतातील पहिले मानवयुक्त मिशन आहे. त्यामुळे विकसीत देश अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन यांसारख्या देशांच्या यादीत आता भारताचा समावेश होऊ शकतो.
चंद्रावर जमीन विकत घेणे – हा लेख देखील नक्की वाचा
भारताच्या या आधीच्या समुद्र मोहिमा
स्वराज्यातल्या आरमाराचा वारसा पुढे नेणारे नौदल म्हणजे भारतीय नौदल सेना. आयएनएस म्हणजे Indian Naval Ship म्हणजेच भारतीय नौदल जहाज. 1612 मध्ये याची स्थापना ईस्ट इंडियाने केली त्यानंतर 1685 मध्ये त्याला बॉम्बे मरीन असे नाव देण्यात आले. त्यानंतर 1934 मध्ये Indian Navy म्हणजेच भारतीय नौदल सेना असे नामांतर करण्यात आले.
आयएनएस विक्रांत (INS Vikrant)
भारताच्या नौदलातील उल्लेखनीय कामगिरी म्हणजे आयएनएस विक्रांत (INS Vikrant). 1957 मध्ये ब्रिटिश नौदलाकडून भारताने विक्रांतला विकत घेतले. 1965 आणि 1971मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात आयएनएस विक्रांतने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यानंतर अलीकडच्या काही वर्षात भारताने स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांतची निर्मिती केली. 45 हजार टन वजन असलेली या युद्धनौकेची उंची 59 मीटर इतकी आहे. ही युद्धनौका कोच्चीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलात सामील करण्यात आली. स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाजाला नौदलात महत्वाचे स्थान आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात एकूण 150 युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश आहे.भारताच्या नौदलातील उल्लेखनीय कामगिरीमध्ये युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य यांचा समावेश होतो.
आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya)
रशियाकडून नोव्हेंबर 2013 मध्ये भारतीय नौदलात ताफ्यात आयएनएस विक्रमादित्यला सामील करण्यात आले आहे. आयएनएस विक्रमादित्य ही भारताची एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे, जी 20 मजली जहाज, 284 मीटर लांब आणि 60 मीटर उंच आहे. त्याचं वजन 40 हजार टनांपेक्षा जास्त आहे. एका वेळी सुमारे 1600 सैनिक त्यावर तैनात असतात. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 ऑगस्ट 2023 रोजी कोलकातामधील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनिअर्स (GRSE) द्वारे विंध्यगिरी युद्धनौकेचे करण्यात आले असून फेब्रुवारी 2025 पर्यंत भारतीय नौसेनेत सहा युद्धनौका सामील होणार आहेत.निलगिरी, विंध्यगिरी, उदयगिरी, तारागिरी, हिमगिरी आणि दूनागिरी अशी या युद्धनौकांची नावे आहेत.
बलाढ्य भारत
अवकाशानंतर आता समुद्रातील रहस्यांचा शोध घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. येणाऱ्या काळातील युद्ध आणि इतर बाबींचा विचार पाहता या मिशनमुळे भारताची समुद्री ताकद वाढणार आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात हरकत नाही. त्यामुळे इतर बलाढ्य देश जसे की चीन, जपान, अमेरिका,रशिया याप्रमाणे भारत देखील समुद्रात आपली ताकद वाढवणार असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या पुढील काळात युद्ध हे समुद्रमार्गे होऊ शकतं, अशी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी आधीच व्यक्त केली होती. ज्याची सागरी तटबंदी मजबूत त्याची समुद्रावर सत्ता असते. जे महाराजांचे विचार आजही लागू पडतात. भारतात झालेला मुंबई दहशतवादी हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांनी सागरीमार्गे घुसखोरी केली. त्यामुळे जलमार्ग आणि महासागरावर आपले वर्चस्व जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हा शत्रूवर विजय मिळवणे सोपे जाईल. फक्त पर्यटन आणि संशोधनच नाही तर सीमसुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मिशन भारतासाठी उल्लेखनीय ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बलाढ्य राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश होऊ शकतो.